मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar)यांचा कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आता शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत सुप्रिया सुळे( Supriya Sule ), शिरुरमधून अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe)आणि अहमदनगरमधून निलेश लंके (Nilesh Dnyandev Lanke)नावाची घोषणा केली आहे .यानंतर लगेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार(Sunetra Pawar )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळं या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच, सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला होता . तेव्हापासून सुनेत्रा पवारच बारामतीतून दादांच्या उमेदवार असतील हेही स्पष्ट झालं होतं. अखेर अधिकृत घोषणा झाली आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सध्या प्रचारातही बदल आवश्यक आहे, असं सांगतानाच सुनेत्रा पवार मतदारांना आपल्या विजयी करण्याचं आवाहन करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून मला बारातमती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्याचे आभार मानले. जिथे जाईन तिथे लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे. त्या उत्साहाला पाहून वाटतं की ते दादांच्या पाठीशी उभे राहतील. जनतेने ठरवलं आहे की मला उमेदवारी द्यायची. आता जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे”, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज लोकसभेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानुसार शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार गटाने उमेदवार घोषित करताच काहीवेळातच सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली