मुंबई

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदी शपथ ; राजनाथ सिंह, अमित शाहसह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ !

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली . त्यांच्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनीही सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली . देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्र्पती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला . मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ लेता हूँ की, विधिद्वारे स्थापित सच्ची श्रद्धा और निष्ठा से काम करुंगा, असे म्हणत मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते .

महायुतीला लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळाले. भाजपला 240, तर महायुतीला 294 जागा मिळाल्या . त्यानंतर महायुती घटक पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली. त्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. आज नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर निवडून आलेल्या वरिष्ठ प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटतचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल यांनी देखील शपथ घेतली आहे. याशिवाय धर्मेंद्र प्रधान, लालन सिंह, वीरेंद्र कुमार आदींनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तसेच या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली . यांच्यासह रक्षा खडसे, पुण्याचे नवनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ हे भाजपाच्या कोट्यातून राज्यमंत्री तर आरपीआयचे आठवले गटाचे रामदास आठवले यांनी देखील सलग तीसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तसेच मंत्रिमंडळात राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह जितिन प्रसाद , तसेच राजस्थानच्या बिकानेरमधून लोकसभेवर विजयी झालेले अर्जुनराम मेघवाल तर राव इंद्रजित सिंह हे गुरूग्रामधून ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. उधमपूरमधून निवडून आलेले जितेंद्र सिंह तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि खासदार जी किशन रेड्डी , तसेच हरदीप सिंग पुरी आणि मनसुख मांडवीय, जी किशन रेड्डी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली . तर भूपेंद्र यादव आणि गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णादेवी, किरेन रिजिजू यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे , सर्वानंद सोनावाल, वीरेंद्र कुमार, टीडीपी नेते किंजरापू राम मोहन नायडू आणि प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जोयल ओरम, गिरिराज सिंह, अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तसेच जेडीयूचे नेते, राजीव सिंह ‘लालन’ यांच्याबरोबर .हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे ( सेक्यूलर ) संस्थापक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच माजी पेट्रोलियम मंत्री, धमेंद्र प्रधान यांनी मोदी 3.0 सरकारमध्ये शपथ घेतली . पहिल्यांदा लोकसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले पीयूष गोयल, .कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, एच. डी कुमारस्वामी , हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर,.माजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर., .माजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन , .मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली .

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची नावे

गुजरात – 1.अमित शाह
2.एस जयशंकर
3.मनसुख मंडाविया
4.सीआर पाटिल
5.नीमू बेन बंभनिया

हिमाचल – जे पी नड्डा

ओडिशा – 1.अश्विनी वैष्णव
2.धर्मेंद्र प्रधान
3.जुअल ओरम

कर्नाटक – 1.निर्मला सीतारमण
2.एचडीके
3.प्रहलाद जोशी
4.शोभा करंदलाजे
5.वी सोमन्ना

महाराष्ट्र – 1.पीयूष गोयल
2.नितिन गडकरी
3.प्रतापराव जाधव
4.रक्षा खडसे
5.रामदास अठावले
6.मुरलीधर मोहोल

गोवा – 1.श्रीपद नाइक

जम्मू-कश्मीर – 1.जितेंद्र सिंह

मध्य प्रदेश – 1.शिवराज सिंह चौहान
2.ज्योतिरादित्य सिंधिया
3.सावित्री ठाकुर
4.वीरेंद्र कुमार

उत्तर प्रदेश – 1.हरदीप सिंह पुरी
2.राजनाथ सिंह
3.जयंत चौधरी
4.जितिन प्रसाद
5.पंकज चौधरी
6.बी एल वर्मा
7.अनुप्रिया पटेल
8.कमलेश पासवान
9.एसपी सिंह बघेल

बिहार – 1.चिराग पासवान
2.गिरिराज सिंह
3.जीतन राम मांझी
4.रामनाथ ठाकुर
5.ललन सिंह
6.निर्यानंद राय
7.राज भूषण
8.सतीश दुबे

अरुणाचल प्रदेश – 1.किरन रिजिजू

राजस्थान – 1.गजेंद्र सिंह शेखावत
2.अर्जुन राम मेघवाल
3.भूपेंद्र यादव
4.भागीरथ चौधरी

हरियाणा – 1.एमएल खट्टर
2.राव इंद्रजीत सिंह
3.कृष्ण पाल गुर्जर

केरळ – 1.सुरेश गोपी
2.जॉर्ज कुरियन

तेलंगणा – 1.जी किशन रेड्डी
2.बंदी संजय

तमिलनाडू -1.एल मुरुगन

झारखंड – 1.संजय सेठ
2.अन्नपूर्णा देवी

छत्तीसगढ -1.तोखन साहू

आंध्र प्रदेश – 1.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
2.राम मोहन नायडू किंजरापु
3.श्रीनिवास वर्मा

पश्चिम बंगाल – 1.शांतनु ठाकुर
2.सुकांत मजूमदार

पंजाब – 1.रवनीत सिंह बिट्टू

आसाम – 1.सर्बानंद सोनोवाल
2.पबित्रा मार्गेह्रिता

उत्तराखंड – 1.अजय टम्टा

दिल्ली – 1.हर्ष मल्होत्रा

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव