मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळेल यांची लागून राहिलेली उत्सुकता संपली असून या . मोदी सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे . यापैकी महाराष्ट्राला 4 राज्यमंत्रीपदं तर 2 कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आली आहेत . .
या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Ganpatrao Jadhav )यांनी आज केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे . त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तसेच भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत यांना देखील मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली असून त्यांनी राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. तसेच भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण खासदार मुरलीधर मोहोळ( Murlidhar Mohol) यांनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Athawale Ramdas Bandu)यांनीदेखील आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नेतृत्वातील याआधीच्या सरकारमध्येही रामदास आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांची आता पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.
दरम्यान राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी(Nitin Gadkari ) यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते तथा उत्तर मुबई मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल( Piyush Goyal) यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा शिलेदारांची वर्णी लागून त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे .