मुंबई: बाबाजी भक्त परिवाराचे स्वामी शांतीगिरी महाराज नाशिकची (Nashik Lok Sabha) लोकसभा निवडणूक (Shantigiri Maharaj) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत (Milind Narvekar) महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून (MVA) शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) रस्सीखेच सुरू असतांनाच, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांनी काल सायंकाळी नाशिकमध्ये (Nashik) आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा केली. त्यांची हीच घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीची (NCP) यावर भूमिका काय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, हेमंत गोडसेंनी प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षात मी केलेली विकासकामे आणि संघटना बांधणी बघता मला पुन्हा ही संधी देण्यात आली असून, विजयाची हॅटट्रिक होणार की नाही हे नाशिकची जनता ठरवेल. माझी उमेदवारी घोषित झाल्याने कोणाला नाराज होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी महायुतीतील इतर इच्छुक उमेदवारांना लगावला आहे.
एकीकडे हेमंत गोडसे यांच्या नावाची उमेदवारी निश्चित केल्यानंतर आता स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील नाराज होऊन महाविकास आघाडीकडून नाशिक मधील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा यापूर्वीच जाहीर केली आहे. ही निवडणूक महायुतीकडून लढवण्यासाठी ते इच्छुक होते. यासदर्भात त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठकही झाली होती. मात्र, शिंदे यांनी महाराजांना दुसऱ्यांदा भेटण्यास नकार दिला होता.
या पर्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा केल्याने शांतिगिरी महाराज नाराज आहेत. त्यामुळे आता त्यांनी महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला आहे.