नवी दिल्ली
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नवी दिल्लीत हा प्रकार घडला. सुदैवाने हेमंत गोडसे या अपघातातून बचावले आहेत.
शिवजयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरम्यान संसदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे काल दिल्लीला आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते निवासस्थानाच्या दिशेने परतत होते. त्यावेळी एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात गोडसे यांना दुखापत झाली नाही.
बातमी अपडेट होत आहे.