महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘राजकारण’ने 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब, मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवारांचं नेतृत्व मान्य

मुंबई

हिवाळी अधिवेशनाच्याआजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापूर्वी ते अजित पवार गटाच्या (Ajit Pawar faction of NCP) कार्यालयातही गेले होते. याशिवाय अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी (Malik’s support to Ajit Pawar’s group) चर्चा केल्याचं वृत्त आज सकाळी समोर आलं होतं. दरम्यान, अधिवेशनात (Winter session) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे नवाब मलिक कोणाच्या गटात जाणार यावर सुरू असणाऱ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ‘राजकारण’ने 16 ऑगस्ट रोजीच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यात दीड वर्ष कोठडीत घालवलेल्या नवाब मलिक यांना सत्ताधारी भाजपाशी जुळवून घेण्याशिवाय म्हणजेच अजित पवार यांच्या गटात जाण्याशिवाय पर्याय नसेल, अशी शक्यता वर्तवली होती. हे वृत्त खरं ठरलं आहे. मलिकांनी सत्ताधारी बाकावर बसून अजित पवारांचं नेतृत्व मान्य केल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi) मंत्री असलेले नवाब मलिक रोज भारतीय जनता पक्षावर (BJP) आक्रमकपणे तुटून पडत होते. जोपर्यंत ते भाजपावर टीका करत होते, तोपर्यंत सगळे काही अलबेल होते. मात्र, ज्या दिवशी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Devendra Fadnavis) यांच्या संदर्भातील एका गाण्यावर आक्षेपार्ह टिपणी केली, त्याच दिवशी मलिक हे देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आले होते.

तोपर्यंत मलिक यांच्या आरोपांना भाजपातील वेगवेगळे प्रवक्ते उत्तर देत असत. मात्र, अमृता फडणवीस यांचे नाव आल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा बुरखा फाडला होता, मलिक यांनी दाऊद इब्राहीमची (Dawood Ibrahim) मालमत्ता खरेदी केल्याचा दावा केला होता. त्याच दिवशी नवाब मलिक ‘आत’ जातील, याची कुणकुण सगळ्यांनाच लागली होती.

64 वर्षीय नवाब मलिकांनी जवळपास दीड वर्ष इडीची कोठडी (ED custody) किंवा रुग्णालयात काढले आहेत. वयाच्या साठीनंतर कुठल्याही नेत्याला कोठडीत राहण्याची हौस नसते, म्हणूनच तो भाजपमध्ये येण्याचा पर्याय स्वीकारतो, हे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचं ‘ऑफ द रेकॉर्ड’ वक्तव्य खूप काही सांगणारे आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात