मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘अल्पसंख्याक विश्वास मेळावा’ १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवी मुंबई) इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने षण्मुखानंद सभागृहात भव्य महिला मेळावा झाला आणि त्यानंतर युवा मिशन मेळावा पुणे बालेवाडी इथे पार पडला. आता ‘अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे.
अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालोद्दीन, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या विश्वास मेळाव्याला राज्यातील सर्व अल्पसंख्याक समाजातील लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक सेलचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, राज्य कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी केले आहे.