X : @therajkaran
पालघर – भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (MP Suresh alias Balya Mama Mhatre) यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा या आदिवासी भागाचा विकास (Development of Tribal area) करायचा असेल तर या भागात रेल्वे सुरू (railway service) होणे महत्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी संसदेत आवाज उठवेन आणि या भागात रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करेल, अशी ग्वाही दिली.
वाडा येथील दौऱ्यात खासदार बाळ्या मामा यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन इथल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी (Maha Vikas Aghadi) व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. तसेच जनतेची निवेदनही स्विकारली. वाडा (Wada) तालुक्यातील वीजबिल, रस्ते, आरोग्य, शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शासन जनतेला अन्नधान्याचे किट मोफत देत असते. देशाचे भविष्य उज्वल करायचे असेल तर मोफत धान्य देण्यापेक्षा मुला – मुलींचे शिक्षण मोफत केले पाहिजे, त्यांचे आरोग्य उपचार शासकीय व खाजगी रुग्णालयात मोफत केले, तरच त्यांचे भविष्य उज्वल होईल.
वाडा ग्रामीण रुग्णालयाची (Rural hospital) अवस्था ही बिकट आहे. सोयीसुविधा नाहीत आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध नाही याबाबतची माहिती घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शरद पवार) (NCP Sharad Pawar group) खासदार म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मनोर – वाडा – भिवंडी या पट्ट्यात महामार्गाची दुरावस्था झाली आहे. हा दुरुस्त होणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, या रस्त्याची दुरावस्था ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे. नेत्यांची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या अनेक योजना येतात, त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.