ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आता लक्ष्य विधानसभा : काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला

X : @NalavadeAnant

मुंबई

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election result) काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून सर्वांच्या एकजुटीने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे यश आहे, त्यामुळे एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे, आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi government) आणू, असा विश्वास काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला. आघाडीचे राजकारण सोपे नसते, पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली व निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपच्या (BJP) हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही काँग्रेस व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रात १८ जाहीर सभा घेतल्या, मंगळसुत्र, हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे पुढे करत विभाजनकारी राजकारण केले, पण जनता यावेळी मोदींच्या अपप्रचाराला बळ पडली नसल्याचेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली, यावेळी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले व जनतेत मोठा आत्मविश्वास निर्माण केला. देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली, राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत व मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेसने मोठा विजय संपादीत केला असून काँग्रेसच्या या विजयात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे समर्थन आहे. त्यामुळे काँग्रेसवर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा ठाम विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, खा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. कुणाल पाटील, खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, के. सी. पाडवी, आ. अमित देशमुख, अस्लम शेख, सुनिल केदार, डॉ. विश्वजित कदम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी माजी प्रदेशाध्यक्ष स्व. प्रतापराव भोसले व पी. एन. पाटील यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे