मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Loksabha) काँग्रेसने महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )यांना उमेदवारी दिली आहे . तर आज महायुतीकडून त्यांच्याविरोधात संजय मंडलिक रिंगणात उतरले आहे . मात्र महाराजांच्या या उमेदवारीला याआधी वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला होता . आता त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील ओबीसी बहुजन पार्टीने (OBC Bahujan Party)सुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रचाराला सुरुवात केली आहे . त्यामुळे आता मतदारसंघात त्यांना आणखीन बळ मिळणार आहे ..
ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश अण्णा शेंडगे (Prakash Shendge )यांनी महाराजांना पाठींबा देण्याबाबत बोलताना सांगितले कि , कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देत आहेत. आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार आहोत. त्यांची भेट सुद्धा कोल्हापूरमध्ये घेणार आहोत आणि ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे तसेच वंचितच्या नव्या आघाडीत आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच .स्वतः सांगली निवडणूक लढवल्यास ते पाठिंबा देणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे ,मात्र हातकणंगले जागेसंदर्भात आम्ही सोमवारी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं .
दरम्यान ओबीसी बहुजन पार्टीनेही आपले 9 उमेदवार जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रकाश शेंडेगे यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महेश भागवत यांना उमेदवारी दिली आहे. मराठवाड्यातून नांदेड लोकसभा मतदारसंघात ॲड. अविनाश भोशीकर यांना उमेदवारी दिली आहे , ७० टक्के इथे ओबीसी मतदान आहे. परभणीतून हरीभाऊ शेळके यांना उमेदवार देतोय, धनगर नेते आहेत, ते लोकसभा लढवणार आहेत, असंही शेंडगे यांनी सांगितलं आहे .