ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र – खा सुनिल तटकरे

X @NalawadeAnant

मुंबई : शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार (ideology of Shivaji-Shahu Maharaj-Phule-Ambedkar) हा देशाच्या लोकशाहीचा (Democracy) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व राज्यातील जनतेला दिला.

नव्या दमाने, नव्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विधानसभेला सामोरा जाणार असून एकदिलाने मोठी भरारी घेताना राष्ट्रवादीची पताका फडकवण्याचा संकल्प अजित पवार यांनी व्यक्त केला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार हीच राष्ट्रवादीची विचारधारा होती आणि यापुढेही राहिल, असेही अजितदादा यांनी ठणकावून सांगितले.

बळीराजासोबत जोडलेला… शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे. युवक, महिला, मागासवर्गीय, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त अशा सर्व समाजघटकांना पक्षाने जोडून ठेवले आहे. शिवाय या घटकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठया उत्साहात पार पडला.

अजितदादा महाराष्ट्राच्या मनातील भावना, दु:ख जाणतात. राज्यातल्या प्रश्नांची त्यांना समज आहेच, शिवाय प्रश्न सोडवण्याची धमकही आहे, त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी वाटचाल करत राहिल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात नवीन अजितपर्व सुरु झाले असून हे विश्वासार्हतेचे पर्व आहे, विश्वासघाताचे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

‘एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आपला स्ट्राईक रेट किती आहे हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला दाखवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत, हे चित्रही आपल्याला प्रस्थापित करायचे असून जिद्दीने कामाला लागा, असे आवाहनही सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी केले.

पराजयाने नाउमेद होऊ नका. जनतेसाठी २४ तास काम करणारा नेता आपल्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेवा असे सांगतानाच संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली दिसली अशी खोचक टिकाही सुनिल तटकरे यांनी केली.

न पूछो मेरी मंजिल कहाँ है… अभी तो सफर का इरादा किया है… ना हारुंगा हौसला उम्रभर… ये मैने किसी से नही खुद से वादा किया है अशा शायरी अंदाजात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा असून लोकसभा निवडणुकीत पराभवाचं शल्य विधानसभा निवडणुकीत ठासून भरुन काढू असा विश्वास कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात