X: @therajkaran
छ. संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याची चिन्हं आहेत.
अमित शाह सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी निवडून येण्याची क्षमता याच एकमेव निकषावर उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अमित शाह यांनी मुंडेंच्या नेतृत्वाला कौल दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंची बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी निश्चित झाल्याचं समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे या मैदानात उतरतील असं दिसतंय.
मराठवाड्यातील हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार देण्यात येण्याची शक्यता आहे. हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता आहे. जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आताच भाजपमध्ये सामील झालेले अशोक चव्हाण यांच्या भाचीला नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांची भाची मिनल खतगावकर नांदेड लोकसभा लढवताना दिसू शकते. मीनल खतगावकर यांनी अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची भेटही घेतली होती.