मुंबई
लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून पक्षश्रेष्ठींसोबत नावांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघ सर्व पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला आणि उच्चभ्रू परिसर असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
या मतदारसंघातून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या जागेवरून पियुष गोयल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं आहे. राज्यसभेच्या खासदारांनी आता लोकसभा निवडणूक लढवावी, असा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे. पियुष गोयल यांनी मुंबईत नेत्यांची प्राथमिक बैठक घेतली असून त्यांनी स्वत: पक्षश्रेष्ठींचा निर्णय सांगितला.
ठाकरे गटाचा बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळेल?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे (आता ठाकरे गट) अरविंत सावंत ४,२०,५३० मतं मिळवून विजयी झाले होते. यावेळी काँग्रेल पक्षाचे मिलिंद देवार ९९,१६८ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय २०१४ मध्येही अरविंद सावंत ३,७४,०७९ मतांनी विजयी झाले होते. यावेळी देवरा यांना १,२८,२२९ मतं मिळाली होती.