राष्ट्रीय ताज्या बातम्या

मोदींना हरवण्यासाठी प्रियांका गांधींना पुढे करा : प्रकाश आंबेडकराचा काँग्रेसला सल्ला

X: @therajkaran

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत (Mumbai) मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Sarkar) हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 400 जागा निवडून आणणार अशी घोषणा केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागतील. यात लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. ४०० मधून ४८ गेले की ३५२ राहतात. त्यामुळे मोदींच्या 48 जागा आपण कमी करायच्या ही आपली जबाबदारी आहे, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे.

जेवढ्या ताकदीने आपण या निवडणुकीत उतरू, तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष आणि समूह भाजपच्या (BJP) विरोधात आहे, तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या, विचारांची लढाई आपण उभी करतोय. आपण बघत असाल की, मोदी घराणेशाही काढत आहे आणि म्हणतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे. मोदी कितीही वल्गना करत असले की, मी ४०० जागा जिंकणार आहे, पण आतली गोष्ट सांगतो की, ते पूर्णपणे कोसळले आहेत, तो माणूस घाबरलेला आहे, अशा शब्दात आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

या लोकसभा निवडणुकीत मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना (Rahul Gadhi ) पुढं करू नका, तर प्रियंकाला (Priyanka Gadhi) पुढे करा, ती बरोबर त्याचे ४ – ५ वाजवत असते असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला (Congress) दिला.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे