मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी आज प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे .मात्र यावर तब्बल 45 मिनिटे बैठक होऊनही आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीसमोर (MahaYuti )मोठा पेच निर्माण झाला आहे .
या मतदारसंघात महायुतीने शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांना उमेदवारी दिली आहे .तर मविआकडून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी (Raju Shetti) मैदानात आहेत. तर रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार असलयाचे सांगितले आहे .त्यानंतर आता आमदार प्रकाश आवाडे हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले आहेत .त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. .दरम्यान आपल्या उमेदवारीवर ते ठाम राहिले असल्याने त्यांचा फटका आता महायुतीला बसणार आहे ., तर मत विभागणीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील ( Satyajeet Patil ) यांना होणार आहे. त्यामुळे आवाडे यांच्या या धक्कातंत्रामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार असलयाचे दिसून येत आहे. दरम्यान माने विरुद्ध आवाडे असा संघर्ष सुरुच राहिल्यास इचलकरंजीमध्ये ही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे या मतविभागणीचा नेमका फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे.
दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनी एकदाच खासदार होणार आणि खासदार कसा असतो हे दाखवून देणार अशी भूमिका घेतली आहे. याआधी पंधरा वर्षांपूर्वी त्यांचे पुत्र राहुल यांनी लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढविण्याची तयारी केली होती; मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. आता त्यांच्याऐवजी स्वतः आमदार आवाडे हे निवडणूक रिंगणात उत्तरत असल्यामुळे या मतदारसंघातील ही सर्वात धक्कादायक घडामोड आहे. मुळात ते भाजपचे सहयोगी आमदार असल्याने त्यांचा महायुतीचे उमेदवार माने यांना पाठिंबा राहील, असाच सर्वसाधारण अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र आता आपल्या उमेदवारीवर ते ठाम राहिल्याने महायुतीला चांगलाच धक्का बसणार आहे .