मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , मोदींचा चेहरा एवढा भयानक आहे कि आता लोक त्यांना घाबरायला लागले आहेत . या निवडणुकीत ४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? जनता ठरवेल, मोदी ठरवू शकत नाहीत. मोदींनी २०० जागा जिंकल्या तरी खूप आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेष आहे असा घणाघात राऊतांनी चढवला आहे .
पंतप्रधान मोदी अवतारी पुरुष आहे तर मग देशातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या का देत नाही? गंगेत प्रेते वाहत होती तेव्हा अवतारी पुरुष थाळ्या वाजवायला सांगत होता. भाजप हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. मला अटक केली. काय उखडलं? भगवा फडकवत गेलो. भगवा फडकवत आलो. हा देश हुकूमशाही समोर कधीच झुकला नाही. हुकूमशाहाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त 10 टक्के मतदान वाढवा. ईव्हीएम घोटाळा संपून जाईल. ईव्हीएम घोटाळा संपल्यावर मोदींचा पक्ष ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाही, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे . या सरकारने कत्तलखान्यांकडून, गोमांस एक्स्पोर्ट करणाऱ्या लोकांकडून ५५० कोटींच्या देणग्या घेतल्या आहेत. जर ३७० हटवले तर काश्मिरी पंडितांची घरवापसीही व्हायला पाहिजे. मोदींना काश्मिरी पंडितांचे दुःख समजून घ्यायला पाहिजे, ते त्यांनी घेतले नाही असेही ते म्हणाले .. तसेच मोदी हा एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलायची स्पर्धा झाली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल. ते फेकू चॅम्पियन आहेत. राष्ट्रीय स्तरावर देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी आणि अंपायर म्हणौन अमित शाह (Amit Shah) यांना घ्यावे लागेल.असा घणाघात त्यांनी चढवला आहे . ”
मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) अपेक्षेप्रमाणे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात अली आहे . याच्या प्रचारासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आले होते . यावेळी त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे .