X: @therajkaran
दक्षिण भारत दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल , आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत , ज्येष्ठ अभिनेत्री माजी खासदार पद्मविभूषण वैजयंती माला यांची चेन्नई येथे भेट घेतली.
वैजयंती माला यांना भेटून आपल्याला अत्यंत आनंद झाला असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या भेटीचे फोटो देखील शेअर केले असून नेटकऱ्यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि नव्वदी पार केलेल्या रसिकांच्या अत्यंत लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या या भेटीवर खुष होऊन अभिनंदनाचा आणि आनंददायी मेसेजेसचा पाऊस पाडला आहे.