धुळे : भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली. यावेळी त्यांनी ‘कैसे है दाजी साहब!’ असं विचारीत थेट त्यांनी गळाभेट करीत आलिंगन दिले. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी दाजी साहेब रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची व वैद्यकीय उपचाराची माहिती घेतली. यावेळी दाजी साहेब रोहिदास पाटील यांच्या धर्मपत्नी लताताई रोहिदास पाटील यांची राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून सोनिया गांधी यांनी दाजीसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. आमदार कुणाल पाटील, अश्विनी कुणाल पाटील, नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, डॉ. दिलीप पाटील यावेळी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी रोहिदास पाटील आपल्या मुलीकडे कोल्हापुरात गेले असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची फुप्फुसं कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसात त्यांनी रुग्णालयातून सोडण्यात आल होतं. सध्या त्यांची प्रकृती बरी असून ते घरीच विश्रांती घेत आहेत.
कुणाल पाटील यांना भाजपकडून खुली ऑफर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे धुळ्यातील प्रमुख नेते आणि भाजपचे प्रतिस्पर्धी कुणाल पाटील यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली होती. एका कार्यक्रमात शहराच्या महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी आमदार कुणाल पाटील यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली होती. या सर्व प्रकरणानंतर
प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल भाजपात जाईल अशी चर्चा होती. मात्र राहुल गांधींच्या भेटीने अखेर त्याला पूर्णविराम लागला आहे, असं म्हणायला हरकत नाही. रोहिदास दाजी २५ पेक्षा जास्त वर्षे मंत्रीमंडळात होते. त्यांचे वडील चुडामान पाटील पहिली लोकसभा निवडणुकीत जवाहरलाल नेहरु यांच्यापेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून आले होते. यावेळी चुडामान यांना पाहण्याच्या उत्सुकतेने त्यांनी चुडामान पाटील यांची भेट घेतली होती.