ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्यात राज ठाकरेंची खेळी ; कोकण पदवीधर मदारसंघासाठी अभिजित पानसेंना उमेदवारी !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत . अशातच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Konkan Graduate Constituency Election) अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या या खेळीमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे .

कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपच्या अडचणीत वाढ केली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीत आता ठिणगी पडणार का या चर्चाना उधाण आलं आहे . कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्यान मनसेचे उमेदवार अभिजीत पानसेंनी उमेदवारी मिळाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले , लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींना पाठिंबा दिला होता, विधान परिषदेत मोदी नाहीत, असं वक्तव्य अभिजीत पानसेंनी केलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेत मनसेचा महायुतीला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट होतंय. आता या मतदारसंघाचा तिढा कसा सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गट ही आग्रही आहे .या मतदारसंघात सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करीत आहेत. असे असताना मनसेने पानसेंच्या नावाची घोषणा केली. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या १२ वर्षांत गटार, पायवाटांशिवाय पदवीधरांसाठी ठोस काम झाले नसल्याची टीका पानसेंनी केली आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात