ताज्या बातम्या राष्ट्रीय

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध!

X : @NalawadeAnant

मुंबई – राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी (Rajya sabha election) दोन अपक्षांनी भरलेले तीनही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अखेर दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट असल्याने याची अधिकृत घोषणा त्याच दिवशी केली जाईल.

राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारांच्या पाच अर्जापैकी भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन जाधव -पाटील (Nitin Jadhav Patil) यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या सह्या नसल्याने दोन अपक्ष उमेदवारांचे तीन अर्ज बाद ठरले.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) हे जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत जुलै २०२८ पर्यंत होती. परंतु, भाजपने (BJP) त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यात पियूष गोयल मोठया मताधिक्याने निवडूनही आले. त्यामुळे त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) जाणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्य म्हणून काम करण्यास चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

तर सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha) निवडून जाण्यापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale) हे राज्यसभेचे सदस्य होते. ते एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे भोसले यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणाऱ्या भाजपच्या धैर्यशील पाटील यांना खासदार म्हणून काम करण्यास दोन वर्षापेक्षा कमी अवधी मिळेल.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे