मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यापाठीमागे रश्मी ठाकरेंची महत्त्वाकांक्षा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. अशात लोकोसभा निवडणुकांच्या धामधुमीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट रश्मी ठाकरेंनाच लक्ष्य केलंय.
काय म्हणालेत सदा सरवणकर?
रश्मी ठाकरे या दिसायला भोळ्या दिसत असल्या तरी त्या कपटी आहेत, अशी टीका सरवणकर यांनी केलीय. मतदारांशी संवाद साधातनाचा सरवणकर यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना पुढं आणण्यासाठी रश्मी ठाकरेंनी अट्टाहास केल्याची टीकाही सरवणकरांनी केलीय.
अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना रश्मी ठाकरेंनी घरात कोंडून ठेवलं आणि आदित्य ठाकरेंना पुढं आणण्यासाठी प्रयत्न केले. असा दावा त्यांनी केलाय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मुख्यमंत्री करायचं, हीच त्यांची योजना असल्याचंही सरवणकर म्हणाले आहेत.
सरवणकरांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया
रश्मी ठाकरेंबाबत केलेल्या या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. गोरेगावातील काही महिला पदाधिकारी सरवमकरांना साडीचोळी भेट म्हणून पाठवणार आहेत. एकूणच या निवडणुकीच ठाकरेंच्या घराणेशाहीविरोधात महायुतीनं जोरदार हल्लाबोल सुरु केल्याचं दिसतंय. आता रश्मी ठाकरेंवरील या आरोपाला ठाकरे कुटुंबीय काय उत्तर देणार, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाः अकोल्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, नाना पटोले अकोल्यात तळ ठोकून