X: @therajkaran
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या यादीत रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भावजय रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना उमदेवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत झाली. त्यामुळे बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद- भावजय सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसेनां उमेदवारी दिली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद- भावजय असा सामना रंगणार आहे, असे ते म्हणाले. तसेच महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत, रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाच्या चर्चा आहेत. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद- भावजय असा सामना पाहायला मिळू शकणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील बामाभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. जयंत पाटील हे महायुतीत आले असते तर ते नक्कीच मंत्री राहिले असते. आता त्यांच्या लक्षात आले असेल की, आपण चूक केली आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी जयंत पाटलांना (Jayant Patil) लगावला. मनसे (MNS), शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकाच विचार धारेचे पक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत चर्चा झाली असेल तर ते लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.