मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान या निवडणुकीआधीच आता सुनेत्रा पवार यांना सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 2010 मधील लिलावात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना किंमत कमी दाखवत आणि विकून टाकलेला होता. तत्कालीन बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि.ने विकत घेऊन तो तत्काळ जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि. ला भाडेतत्तावर दिला.गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि. ही कंपनी डमी असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले. स्पार्कलिंग सॉइल प्रा.लि. कंपनीकडे जरंडेश्वर कारखान्याचे सर्वाधिक शेअर्स होते. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचं ईडी चौकशीतून समोर आलं होतं.त्यानंतर या कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लीन चीट देण्यात यावी अशी शिफारस आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी याबाबतची बँकेला कोणताही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत १३४३.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार सुनेत्रा पवारांसह ) बारामती अँग्रो लिमिटेड कन्नड सहकारी साखर कारखान्याप्रकरणी रोहित पवार ( Rohit Pawar ) आणि प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.