मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें आणि सत्ताधार्यामध्ये एकमेकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . तसेच निवडणुकीच्या या वातावरणात नाराज झालेले नेते दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे.याच पार्श्वभुमीवर ठाकरेंनी भाजपला (Bharatiya Janata Party) मराठवाड्यात मोठा धक्का दिला आहे . धाराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे (Shivaji Kamble )-यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray group )यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे . त्यामुळे निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला आहे .
माजी खासदार शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी होते. काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम १९९६ मध्ये त्यांनी केले होते. शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला होता.तसेच या धाराशिव लोकसभा मतदार संघातून त्यांनी 1996 व 1999 साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन्ही वेळा ते शिवसेनेत होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर ते शिवसेना सोडून भाजपत गेले होते. आता ते पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत . दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. मोदी यांनी राज्यात शिवसेना फोडली. शिवसेनेचा सातबाऱ्यावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिंदे यांचे नाव लिहिले. उद्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ते असेच करतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे ते म्हणाले .
दरम्यान ठाकरेंनी पुढे बोलताना मोदींचा सध्या जुमला तीन चालू आहे. २०१४ मध्ये त्यांनी पहिला जुमला आणला. २०१९ मध्ये दुसरा जुमला आणला. आता २०२४ मध्ये तिसरा जुमला आणलेला आहे. या जुमलेबाज भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आव्हान ही जनतेला केलं आहे .