X: @therajkaran
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले आहे असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी आज केला. निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हिजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले. असेही रोहित पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले की, या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडे सहा हजार कोटीचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे. असेही रोहित पवार यांनी मागणी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, स्वच्छता काम टेंडर मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपनी यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार करण्यात आला. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाईन केले आणि त्यांनाच मिळाले. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना ही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हिजी कंपनीला ही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडे सह हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे. सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असे रोहित पवार म्हणाले.