नाशिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेत आहेत. काल त्यांनी सहकुटुंचब काळाराम मंदिरात महाआरती केली. आज नाशिकमध्येच ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे.
शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं संजय राऊत ठाकरे गटाच्या महाअधिवेशनादरम्यान म्हणाले. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे वातावरण राममय झाले आहे. त्या वातावरणात उद्धव ठाकरेंनी या महाशिबीराची ज्योत मशात पेटवली आहे. जो अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरेंनी नाशिकची निवड केली, त्याला फार महत्त्व आहे. इथे पंचवटी आहे. प्रभू रामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्येच झाला. म्हणूनच उद्धवजींनी या भूमीची निवड केली, असं ही राऊत पुढे म्हणाले.
जे रामाचं धैर्य ते शिवसेनेचे धैर्य आहे. रामाजा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. ते धैर्य आमच्याकडे नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली नसती, असा घणघात राऊतांनी केला.
शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सुडबुद्धीने कितीही कारवाया केल्या, तरी जनता पाहत आहे. राम मंदिराचे सर्वांना प्रत्यक्षात निमंत्रण मिळाले. मात्र बाळासाहेबांनी यासाठी योगदान दिले, त्यांच्या पुत्राला स्पीड पोस्टने निमंत्रण पाठवणं हे योग्य नाही. काळाराम मंदिरात कालचा दिवस आम्ही उत्साहाने साजरा केला. राम आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही लवकरच सर्वांसह अयोध्येलाही जाऊ.