नाशिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेत आहेत. काल त्यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती केली. आज नाशिकमध्येच ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायेत त्यांचा मुखवटा फाडायचा आहे. याशिवाय मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच होऊच शकत नाही, अस म्हणत ठाकरेंनी भाजप सरकारसमोर गेल्या १० वर्षात काय केलं असाही सवाल उपस्थित केला.
75 वर्षांत काँग्रेसने काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आता दहा वर्षांत काय केले? याचे उत्तर देण्याची ही वेळ आली आहे. राम की बात झाली, आता काम की बात करो? असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले.
मी घराणेशाहीतून आला असलो तरी सर्व शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेत चोरून मिळालेले नाही. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मी ही प्रचार केला होता. माझ्या वीरमर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली. आणि आज त्याच शिवसैनिकांवर खोटे आरोप लावले जात आहेत. त्यांच्यावर ईडीकडून कारवाया करवल्या जात आहेत. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली आहे.
श्रीराम कोणत्या एका पक्षाचे असूच शकत नाही. ते करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आपल्याला ते मुक्त करावे लागणार आहे. म्हणजे भाजपमुक्त श्रीराम आपल्याला करावा लागणार आहे. प्रभुराम हे एकवजनी होते. मात्र, शिवसेनेला वचन दिलेले मोडणारे रामभक्त कसे असू शकता? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.