मुंबई
ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अवमान करून हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवली ते आज राम कोण? आणि रावण कोण? हे सांगत आहेत. संजय राऊत यांची भूमिका तर रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणेच राहिली आहे, असं म्हणज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली.
येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही, असंही पुढे ते म्हणाले.
भाजपचे आमदार नितेश राणे काय म्हणाले…
संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेकवेळा नाक कापून घेतलं पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही. आजही नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अहंकाराची भाषा केली. पण राऊतांनी हे लक्षात ठेवावं शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलं होतं, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही.
आज उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये महाअधिवेशन पार पडले. काल त्यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती केली. आज नाशिकमध्येच ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. यावेळी संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं संजय राऊत ठाकरे गटाच्या महाअधिवेशनादरम्यान म्हणाले. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे वातावरण राममय झाले आहे. त्या वातावरणात उद्धव ठाकरेंनी या महाशिबीराची ज्योत मशात पेटवली आहे. जो अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरेंनी नाशिकची निवड केली, त्याला फार महत्त्व आहे. इथे पंचवटी आहे. प्रभू रामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्येच झाला. म्हणूनच उद्धवजींनी या भूमीची निवड केली, असं ही राऊत पुढे म्हणाले.