X: @therajkaran
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता. याबाबत स्वतः शरद पवार यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार (Madha Lok Sabha Constituency) नाही. तसेच मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे .
याबाबत पुढे ते म्हणाले की, “ईडी, सीबीआय या एजन्सींचा गैरवापर सध्या सुरु आहे. अकाऊंट फ्रिज करणं यातून देशाचा मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न होतोय. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक केली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातयं, कारवाई केली जातेय. देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई झाली नव्हती, राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं आहे. हे धोरण चुकीचं आहे, हे लाजिरवाणं सरकार आहे. सत्येचा गैरवापर करणं या सगळ्या गोष्टींचा मी निषेध करतो.” अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या मागे ताकदीनं उभं राहणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगांत टाकतात. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. ही कारवाई 100 टक्के निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. झारखंड झालं, दिल्ली झाली, अशाच पद्धतीने कारवाई होते, उद्या देशभरात होईल.”, असंही शरद पवार म्हणाले.
ते म्हणाले, देशात लोकशाहीचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यत हे सरकार पोहोचले आहे. केजरीवाल यांना अटक झाली याचा अर्थ केजरीवाल यांच्या 100 टक्के जागा निवडून येतील. मागच्यावेळी भाजपच्या 2 जागा आल्या, आता तेवढ्या देखील येणार नाही. जे आणिबाणीत झालं नाही ते आता होतं आहे. इंडिया आघाडी म्हणून आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी आहे. 80 ते 90 टक्के लोकांना केजरीवाल यांची पसंती आहे. इलेक्टोरल बॉण्डवर सरकार गप्प आहे. सगळे पैसे त्यांना मिळाले आहेत. जमा करायचं जे जमा केलं आहे, म्हणून भाजप गप्प बसली. सुप्रीम कोर्टालासुद्धा भाजपला कारण द्यावं लागतंय.
मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत पवार म्हणाले, राज ठाकरे किती जागा लढवतील, हे पाहावं लागेल. अजित पवार गटाकडून इन्कमिंग आणखी वाढेल. समोरच्या बाजूने उमेदवार घोषित झाले की आणखी वाढेल, असा दावा शरद पवार यांनी केला.