ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून किरण सामंतांची माघार? नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब?

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गट दोघेही आग्रही होते. या जागेवरुन शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपले ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर किरण सामंतांची माघार घेतल्याचं समोर आलं आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडिावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व अब की बार ४०० पार करण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत, आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे – किरण सामंत, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अद्याप त्यांनी माध्यमांशी बोलून याबाबत माहिती दिलेली नाही. हे ट्विट त्यांनी काही वेळाने डिलिट केल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र किरण सामंतांनी माघार घेतल्यानंतर ही जागा भाजपसाठी मोकळी झाली आहे. नारायण राणे या जागेवरुन आग्रही आहे. दरम्यान आज नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कोकणात पाव रोवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं विधान नारायण राणेंनी केलं होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ताकद नसून भाजपने उमेदवारी दिली, तर मी लोकसभा निवडणूक लढवीन आणि जिंकून येईन, असं नारायण राणे म्हणाले होते. यामुळे या जागेवरुन भाजपचे नारायण राणे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

त्यामुळे या मतदारसंघात नारायण राणे विरूद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत अशी लढत रंगणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. अशावेळी नारायण राणे येथून उभे राहिल्यास त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे सांगणं कठीण आहे.

असा नजिकचा इतिहास असताना, नारायण राणे मैदानात उतरू शकतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेची ताकद होती. मात्र फुटीनंतर ही ताकद विभागली गेली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या जागा…

चिपळून – शेखर निकम – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

रत्नागिरी – उदय सामंत – शिवसेना शिंदे गट

राजापूर – राजन साळवी – शिवसेना ठाकरे गट

कुडाळ – वैभव नाईक – शिवसेना ठाकरे गट

कणकवली – नितेश राणे – भाजप

सावंतवाडी – दीपक केसरकर – शिवसेना शिंदे गट

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात