मुंबई : लोकसभा निवडणुकीत (LokSabha election )राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला असल्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे . महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची चलबिचल सुरु आहे . अशातच आता शिंदे गटात विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कारण शिंदें गटाच्या (Shinde group ) एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey )यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आतापर्यंत शिंदे गटाचे आमदार शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती दिली आहे .तसेच. आता लोकसभेच्या निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते असे ते म्हणाले आहेत . त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे . महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली. लोकसभा निवडणूक निकालात या फुटीचेही परिणाम दिसून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी ८ जागा जिंकल्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेन २१ पैकी ९ जागा जिंकल्या. सत्ताधारी महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीने कामगिरी जबरदस्त कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर दुसरीकडे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार शरद पवारांच्या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनीही याला दुजोरा दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 12 ते 13 आमदार संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात मोठे भूकंप होणार, असेच संकेत मिळत आहेत.