मुंबई: शिरूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका करणारे आणि कलाकार लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मला उमेदवारी देऊन तुम्ही चूक केली, मग तुमच्या सोबत येण्यासाठी दहा वेळा निरोप का पाठवले,’ असा बिनतोड प्रश्न कोल्हे यांनी अजित पवारांना केला आहे.
शिररूमध्ये (Shirur )झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली होती. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकारांना उमेदवारी देतो, पण त्यांना लोकांशी काही देणंघेणं नसतं, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, गोविंदा, हेमा मालिनी अशा लोकांचा दाखलाही दिला होता. त्यांच्या या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.
अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत युती केल्यानंतर अमोल कोल्हे हे सोबत येतील, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, कोल्हे हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानं अजित पवार संतपाले आहेत. शिरूरच्या निवडणुकीत कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या टीकेला कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करून अत्यंत मुद्देसूद आणि संयमी उत्तर दिलं आहे. ‘अजित पवार सेलिब्रिटी म्हणून मला हिणवतात आणि माझी तुलना इतर सेलिब्रिटींशी करतात. पण ज्यांच्याशी ते माझी तुलना करतात, त्यांना कधीही संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. मी माझ्या मतदारसंघाचे आणि सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडून तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला आहे, असं कोल्हे यांनी सांगितलं.
Also Read: माओवाद्यांशी संबंधावरून अटकेत असलेले प्रा. साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष सुटका