महाराष्ट्र ताज्या बातम्या

मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही – छगन भुजबळ

X : @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि सत्तारूढ पक्षातील अजित पवार गटाचे मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत असताना सोमवारी भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही नेत्यांना अंगावर घेतले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही, अशा संतप्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पिठासीन अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सभागृहाचे कामकाज चालवावे –  डॉ. नीलम गोऱ्हे

X : @therajkaran मुंबई: आपल्या संविधानाचा सर्वांनी आदर करावा, निषेध नोंदविण्यासाठी बऱ्याच वेळेला सभागृहात सदस्यांकडून कागद फेकण्यात येतात, बाक वाजविले जातात, आक्रमकपणे पिठासीन अधिकाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न केला जातो.  अशावेळी पिठासीन अधिकाऱ्यांनी घाबरून न जाता, दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेतला पाहिजे. पिठासीन अधिकाऱ्याला बऱ्याचदा कामकाज चालवणे अशक्य असते. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांनी सामंजस्याची भूमिका […]

pakistani diary पाकिस्तान डायरी

हाफिज सईदच्या निमित्ताने 

Pakistan Dairy X: @therajkaran दहशतवादी हाफिज सईद याच्यावरून पाकिस्तानमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल अशी शक्यता आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद (Mastermind of Mumbai terror attack) सूत्रधार होता. त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने गुरुवारी केली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानात (Pakistan) त्याचे पडसाद उमटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासंदर्भात द्विपक्षीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

मोठी बातमी! भ्रष्ट आणि निलंबित क्रीडा अधिकाऱ्यांना कोण वाचवतेय? 

जळगाव राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे मंत्री शोधून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

‘उज्वल – आदित्य’ पुरवठादारावर सरकार मेहरबान; ‘आनंदाच्या शिधा’तून किमान पंधराशे कोटींची केली खैरात

X : @vivekbhavsar नागपूर :राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Government) गेल्या वर्षी वंचित घटकाला दिवाळी साजरी करता यावी यासाठी स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) या नावाने सणासाठी लागणारे पाच जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ दीड कोटीहून अधिक लाभार्थीना होईल, असा आदर्श […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

भ्रष्ट आणि निलंबित क्रीडा अधिकाऱ्यांना कोण वाचवतेय?

X: @vivekbhavsar नागपूर: राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण इम्पॅक्ट :  धुळे पोलीस अधीक्षकांची बदली

Twitter: @vivekbhavsar मुंबई  धुळे जिल्ह्यात फोफावलेली गुंडगिरी, शस्त्रांस्त्रांचे कारखाने आणि  तस्करी तसेच शेकडो एकरवर होणारी गांजाची शेती याकडे दुर्लक्ष करून केवळ बदल्यांमध्ये लक्ष घालून ‘माया ‘ जमवणारे धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची अखेर आज बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या दुय्यम आणि दुर्लक्षित विभागात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पाठवण्यात आले आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या

‘वर्षा’ वरील गणेशोत्सव आणि चर्चा शिवसेनेच्या व्यंगचित्राची

Twitter: @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी संपन्न झालेल्या गणेशोत्सवाची दखल आता सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेज वरुन यावर भाष्य करणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रांची जोरदार चर्चा आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात इर्शाळवाडी ग्रामस्थ, वारकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, महिला, उद्योजक, विदेशी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच स्तरातील […]

मुंबई ताज्या बातम्या

मराठी माणूस या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.  मुलुंडमध्ये दोन दिवसांपूर्वी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपमध्ये प्रवेशासाठी एकनाथ खडसेंचा खटाटोप – गिरीश महाजन यांचा दावा

Twitter : @SantoshMasole धुळे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत आहेत, कोणाला गळ घालत आहेत, हे मला माहीत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे, असा गौप्यस्फोट धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मी हे हलकं फुलकं बोलत […]