शिवतारेंचा पवार विरोध मावळला? शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी वर्षावर काढली शिवतारेंची समजूत, आता भूमिका स्पष्ट करणार
मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या शिंदे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा राग मावळला असण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवतारे यांच्याशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. या बैठकीत शिवतारे यांच्या आक्षेपावर चर्चा करुन त्यांची समजूत काढली असल्याचं सांगण्यात […]









