ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना बाहेरचा रस्ता ; शिंदेच्या शिवसेनेतून पक्षाच्या शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाणार

मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार केला आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवतारेंना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, अस प्रतिउत्तर शिवतारेंनी दिल्यानंतर अखेर शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.त्यांना लवकरच पक्षाकडून पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाणार आहे .यानंतरही त्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नारळ दिला जाईल, असे सांगितले जात आहे.

बारामतीसाठी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती. तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती अस्तित्त्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, आता शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा मार्ग निवडला आहे .दरम्यान शिवतारेंना शिवसेनेकडून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विचारण्यात आले. तेव्हा शिवतारे यांनी म्हटले की, मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. मी उद्या खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे. मी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. मात्र, आता शिवसेनेने त्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर विजय शिवतारे पुढे काय करणार, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची ‘विंचवा’शी तुलना केली होती. शिवतारेंच्या या विधानामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवतारे यांच्या या विधानावरून अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील (umesh patil ) यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. विजय शिवतारे यांना निवडणूक लढवायची असेल तर खुशाल लढवावी”, असा निर्वाणीचा इशारा उमेश पाटील यांनी दिला.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात