ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर जानकरांचं ठरलं ; परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

मुबंई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar )लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत .अखेर आज त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group)त्यांच्या कोठ्यातून परभणीतून (Parbhani) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती […]

महाराष्ट्र मुंबई

बारामतीतली लढत स्पष्ट, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत निश्चित, इतर जागांचं काय?

मुंबई- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत आज अखेर घोषित झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानं हा संघर्ष येत्या काळात अधिक जोमदार होण्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत नणंद -भावजच्यात काटे कि टक्कर ; सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar)यांचा कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आता शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत सुप्रिया सुळे( Supriya Sule ), शिरुरमधून अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe)आणि अहमदनगरमधून निलेश लंके (Nilesh Dnyandev Lanke)नावाची घोषणा केली आहे .यानंतर लगेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार(Sunetra Pawar )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… बारामती फक्त पवारसाहेबांचीच ” : रोहित पवारांच वक्तव्य चर्चेत

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांनी दौऱ्यादरम्यान भाजपवर हल्ल्बोल चढवला आहे .बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. भाजपकडून आपल्या विचारांवर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. आपण लोकांना दाखवून द्यायचं की बारामती ही फक्त पवारसाहेबांचीच आहे…, असं रोहित पवार म्हणाले आहेत . आपल्या मतदारसंघातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पाणावलेले डोळे, राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावुक; आता शरद पवार गटातून लोकसभेचे उमेदवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्ता बैठकीत आपल्या पारनेरच्या आमदाकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि कार्यकर्त्यांसमोर ते भावुक झाले होते. निलेश लंके लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्या लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंकेनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पोळीवर पडले तूप शिवतारे झाले चूप

शिवतारेंचे बंड स्क्रिप्टप्रमाणेच झाले थंड X : @ajaaysaroj मुंबई: जनतेचे प्रश्न सोडवण्याची हमी मिळाल्याने आपले समाधान झाले आहे, अशी मखलाशी करून स्वतःचा मतलब साधत शिवसेनेचे आक्रस्ताळे नेते विजय शिवतारे यांनी स्वतःच्या फुगवलेल्या फुग्याला स्वतःच टाचणी लावली आहे. महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आता त्यांनी स्वतःच्या गळ्यात हार म्हणून घातला असून पोळीवर तूप मिळाल्यानेच विजयबापू चूप झाले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात सस्पेन्स वाढला ; शरद पवारांनी निवडणूक लढण्याची शक्यता फेटाळली

मुंबई : साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील ( Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आणि त्यानंतर शरद पवारांनी स्वतः राजेंविरोधात निवडणूक लढवावी अशा मागणीने जोर धरला . मात्र आता ही मागणी स्वतः शरद पवार यांनीच फेटाळून लावली आहे . आज साताऱ्यातील राष्ट्रवादीचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपचे पैसे घ्या अन काँग्रेसलाच मतदान करा ; दिनकर मानेंच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचे खटके उडत आहेत .अशातच आज.शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने (Dinkar Mane) यांनी पंतप्रधान मोदी, अजित पवार, अशोक चव्हाणांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे म्हणत सुटला आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून दिलासा ; तब्बल सात वर्षानंतर 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणाचा तपास बंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांना एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे . याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोणत्याही गैरकृत्याचा कोणताच पुरावा नाही, त्यामुळे सीबीआयने (CBI)या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे . मात्र […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्यातून उदयनराजे, नाशिकमधून भुजबळ?, महायुतीत कोणत्या मतदारसंघांत बदल?

मुंबई- सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा सुटल्याचं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासी झालेल्या चर्चेनंतर या विषयावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या […]