मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांनी दौऱ्यादरम्यान भाजपवर हल्ल्बोल चढवला आहे .बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. भाजपकडून आपल्या विचारांवर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. आपण लोकांना दाखवून द्यायचं की बारामती ही फक्त पवारसाहेबांचीच आहे…, असं रोहित पवार म्हणाले आहेत .
आपल्या मतदारसंघातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या हातात आहेत. ते देखील सोडवण्यासाठी सुप्रिया ताईंनी प्रयत्न केला आहे. इथल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचा… सगळ्या महाराष्ट्रभरातून लोक इथं आलेले आहेत. या मतदार संघात राज्यभरातून लोक येतात. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे असेही पवार म्हणाले . दरम्यान लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.कारण आमदार निलेश लंके यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटातून ते उमेदवार असणार आहे. घड्याळ सोडून त्यांनी आता तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.यांवरून बोलताना त्यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है… अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकजण परत येण्यासाठी इच्छुक आहेत, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार पहिल्यादांच आमने-सामने उभ्या ठाकणार आहेत .त्यामुळे सुप्रिया सुळे किती मतांनी निवडणून येतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले आहेत . दरम्यान लोकसभा निवडणुकीत प्रशासनाकडून आपल्यावर मोठा दबाव टाकला जात आहे. अनेक ठिकाणी गुंडाचा वापर केला जात आहे. ते लोक काहीही करू शकतात. ते लोक बूथ देखील ताब्यात घेतील. त्यांनी पगारी लोक ठेवले आहेत. आपलं वातावरण लई भारी आहे… बारामतीत विजय आपलाच आहे. सगळ्यांनी टार्गेट घेऊन काम करा. अख्ख्या महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे भाजप आता घाबरला आहे, असंही पवार यावेळी म्हणाले आहेत ..