लेख महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव.. अन जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉ. विजयकुमार गावित

X : @KhandurahG सातपुडा पर्वत रांगांवर गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती दि. 1 जुलै 1998 रोजी झाली. आज या जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या जिल्हा निर्मितीमागे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी याकरिता आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, हे नाकारुन चालणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्बल २५ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार !

मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

केजरीवाल यांच्यासारखी वेळ उद्धव यांच्यावर येऊ शकते : नारायण राणे 

X : @therajkaran मुंबई: अमेरिका आणि इटलीचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करतात. मोदींमुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. २०३० मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. भाजप (BJP) हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे लोकसभेत ३०३ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर आम्ही चारशे पार पोहचू, असा आत्मविश्वास केंद्रीय मंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Buldhana Lok Sabha : बुलढण्यात आमदार गायकवाड यांचा अर्ज दाखल, शिवसेनेत खळबळ, खासदार जाधवांना आव्हान

X: @ajaaysaroj मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष धनंजय बोराटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे उपस्थित होते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावरच खासदार प्रतापराव जाधवांना डावलून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतूनच गायकवाड यांना जाधव यांच्या विरोधात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांकडून हवी मुलीच्या राजकीय भवितव्याची हमी

X : @vivekbhavsar मुंबईबारामती लोकसभा निवडणुक लढण्यासाठी झोकून देऊन काम करणारी अंकिता हर्षवर्धन पाटील हिला ऐनवेळी निवडणूक स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने काहीसे नाराज असलेले माजी मंत्री आणि तिचे पिताश्री हर्षवर्धन पाटील यांना कन्येच्या राजकीय कारकिर्दीची चिंता लागून राहिलेली आहे. अजित पवारांमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, असे असतानाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरात उद्धव ठाकरें आणि शाहू महाराजांची गळाभेट, तब्बल अर्धा तास चर्चा

X: @therajkaran कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Lok Sabha) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“…..तर ते महाराष्ट्रद्रोही म्हणून ओळखले जातील” : संजय राऊतांचे टिकास्त्र

X: @therajkaran भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी व शहा यांच्या पक्षाला कोणी मदत करणार असतील तर अशा लोकांची ओळख महाराष्ट्रद्रोही अशी राहील,’ असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना […]

महाराष्ट्र विश्लेषण

Eknath Shinde : इंडिया आघाडीची सभा ही तडीपार नेत्यांची : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

X : @NalavadeAnant मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे, सत्तेतून हद्दपार केलेल्या तडीपार नेत्यांची सभा होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे गट आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांवर घणाणाती टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोदी आणि शहांनी आधी त्यांची घराणी सांगावी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत […]