X: @therajkaran
कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Lok Sabha) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या भेटीनंतर उद्धव ठाकरें म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील, कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी फक्त आत्ताच आलो असून महाराजांच्या प्रचाराला आणि विजयी सभेला सुद्धा येणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच विजयासाठी आशीर्वाद घेतल्याचे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 1997 मध्ये आले होते, त्यानंतर प्रथमच मी याठिकाणी आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या कोल्हापूर लोकसभेला (Kolhapur Lok Sabha) शाहू महाराज विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशी लढत असणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे सांगलीसाठी (Sangli ) रवाना झाले.