ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यात कमी मतदानानं भाजपा चिंतेत, आता प्रत्येक मतदारसंघात 10 टक्के मतदान वाढवण्याचे प्रयत्न, प्रचारही आक्रमक

मुंबई- पहिल्या टप्प्यात देशात केवळ 63 टक्के मतदान झालंय. हे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक कमी मतदान आहे. 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्ते आले होते, त्यावेळी 66 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 साली पुन्हा मोदी सत्तेत आले तेव्हा 67.40 टक्के तदान झालं होतं. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान पार पडलंय. यामुळं […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

अमरावतीत अमित शहांच्या सभेच्या मैदानावरुन हायव्होल्टेज ड्रामा, दंगल होऊ नये म्हणून माघार, बच्चू कडूंची घोषणा

अमरावती- नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आधीच वादात सापडली आहे. ही सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या सायन्स कोअर मैदानावर त्याच दिवशी सभेची परवानगी बच्चू कडू यांनी मिळवली होती. मात्र अमित शाहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. यानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्यासोबत या मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावरुन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच ; मिंध्याना मी मानतच नाही ; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजप( bjp )आणि शिंदे गटावर (shinde group )सडकून टीका केली आहे . बाळासाहेबांच्या शिवसेनेत बंडखोरी करून गद्दारी करणाऱ्या मिंध्याना मी मानतच नाही . या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली ; मोदी -शहांना ओपन चॅलेंज ; “हिम्मत असेल तर या ठाकरेला संपवून दाखवा”

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची परभणीत जाहीर सभा पार पडली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांची ही सभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसेंची उणीव भासणार ; रोहिणी खडसे

मुंबई : आगामी लोकसभेसाठी रावेर मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांची भाजपविरोधात खेळी ; फडणवीसांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीत जाणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूरमधून भाजपला मोठा धक्का दिला आहे .सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू संजय क्षीरसागर ( Sanjay kshirsagar) शरद पवार गटात (Sharadchandra Pawar group )प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोणतीही निवडणूक बिनविरोध होण्यास विरोध, सत्यजीत तांबे यांचं भाजपावर टीकास्त्र

मुंबई- सूरतमध्ये भाजपाचे लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्यानं नवा वादंग निर्माण झालेला आहे. सूरतचे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभोणी यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचं समोर आलंय. भाजपाकून मिळालेल्या निर्देशानुसार कुंभोणी यांनी प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवत पावलं उचलली, त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज बादल झाल्याचं सांगण्यात येतंय. कुंभोणी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात अनुमोदक म्हणून कार्यकर्ते आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नेमक्या कुणाच्या अटकेचा होता प्लॅन, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? अटकेच्या भीतीनं फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडलं, काय म्हणालेत संजय राऊत?

मुंबई- मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचं षडयंत्र रचलं जात होतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. खोट्या गुन्हात या चारही नेत्यांना अडकवण्याचा कट होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.२०२४ च्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा, काय निघालाय तोडगा?

मुंबई- महायुतीत अद्यापही जागावाटटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. अद्यापही दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि नाशिक या सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशात राज्यात १६ जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आत्तापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर झाले आहेत. या सातपैकी सहा जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘काँग्रेस जनतेची संपत्ती घुसखोरांना वाटेल, मंगळसूत्र घेतली जातील’, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड

नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही […]