मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूरमधून भाजपला मोठा धक्का दिला आहे .सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू संजय क्षीरसागर ( Sanjay kshirsagar) शरद पवार गटात (Sharadchandra Pawar group )प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे . त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे .
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: संजय क्षीरसागर यांनी दिली. ते म्हणाले , गेली 25 वर्षे म्हणजे 1998-99 पासून भारतीय जनता पक्षामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मात्र 2006 सालपासून मला पक्षात अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. 2014 च्या पराभवानतर पक्षाची इच्छा असताना पक्षातील काही नेत्यांच्या दबावामुळे पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केले. जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजप सोडण्याचा निर्णय घेत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत मी प्रवेश करणार आहे.प्रणिती शिंदेंना पाठिंबा देणार आहे, असे त्यांनी सांगितले . याआधी जिल्हापरिषद , विधानसभा, जिल्हा पंचायत अशा अनेक निवडणुका लढवल्या. सामान्य जनतेवर होणाऱ्या अन् अनेक मोर्चे काढले. कठीण काळात भाजपसोबत होतो. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ज्या तालुक्याकील लोकांनी माझी पाठराखण केली. त्यांना मी आजपर्यंत काही देऊ शकलो नाही.लोकसभेची चार वेळा उमेदवारी मागितली परंतु मला उमेदवारी दिली नाही याचे मला दु:ख नाही. पण सामान्य जनतेसाठी मी आता कार्य करणार आहे . भाजपमध्ये होणार अपमान यामुळे पक्षाला मी रामराम करणार असे ते म्हणाले .
दरम्यान सोलापुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने (Congress) सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना (Praniti Shinde) उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने (BJP) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे.