ताज्या बातम्या महाराष्ट्र

केजरीवालांचा आयफोन स्वीचऑफ ; ईडीच्या पथकाची अँपल कार्यालयात ठाण

मुंबई : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल( Arvind Kejriwal )यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे .केजरीवाल यांनी त्यांचा आयफोन (iPhone )स्विच ऑफ केला असून त्याचा पासवर्ड पण ते कोणाला सांगत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने (Enforcement Directorate )तातडीने फोन निर्मिती करणारी कंपनी ॲप्पलकडे धाव घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली आहे . या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrapur Lok Sabha : कुणबी बहुल  चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

X : @vivekbhavsar  मुंबई: कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने त्यांचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार हे कोमटी या अल्पसंख्यांक समाजाचे आहेत तर धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेआधी आपवर संकट ; पक्षाच्या आणखीन चार नेत्यांना अटक होणार ; मंत्री अतिशी

मुंबई : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार एव्हेन्यू कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौकशीदरम्यान आतिशींसह सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचा दावा ईडीने (ED) न्यायालयात […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशीव लोकसभा मतदारसंघात ओमराजेंविरोधातील उमेदवार ठरला?, अर्चना राणा रगजीतसिंह पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर कुणाचा उमेदवार असणार, .याची उत्सुकता होती. महायुतीकडून तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, हे स्पष्ट होताना दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत होतं. मात्र सावंत हे त्यांच्या पुतण्यासाठी आग्रही होते. या नावाला शिंदेंच्या शिवसेनेतूनच […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

विदर्भात आता आदित्य ठाकरे मैदानात, यवतमाळमधून महायुतीला देणार आव्हान

नागपूर – विदर्भात रणरणत्या उन्हात प्रचारही तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि अर्ज भरण्याची लगबग सुरु झालीय. यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं बळ वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहेत. यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार सभा यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म असलेल्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?

मुंबई– पक्षात अन्याय झाला म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला होता. आता तेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राजकारण बरंच बदललं असल्याचं सांगण्यात येतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होणार? मतदारांत काय प्रतिक्रिया? महायुतीला कशाचा बसू शकेल फटका?

मुंबई – राज्यात १९ एप्रिल ते २० मे या काळात पाच टप्प्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं असून, काही जागांचा तिढा येत्या काही दिवसांत सुटण्याची शक्यता ाहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवातही झालीय. मात्र तरीही संपूर्ण विजयाची खात्री दोन्ही बाजूंना देता येत नाहीये. महायुतीसमोर प्रतिमेचं आव्हान […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजपाला सोडावाच लागणार? शिंदेंच्या शिवसेनेसमोर नवा पेच?

मुंबई- महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी काही जागांवरुन अद्यापही सहमती झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यात प्रामुख्यानं ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळतायेत. तर दुसरीकडं हेमंत गोडसे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी, यासाठी गोडसे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजूनही घोळ काही संपत नाही; जागावाटपावरून महायुती व आघाडीत वाद कायम

X : @NalavadeAnant मुंबई: देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महाराष्ट्रात मात्र जागावाटपावरून अजूनही काही जागांवरून आघाडी व महायुतीमध्ये निर्माण झालेला घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. त्याचे कारण महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावरून वाद सुरू झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मित्र […]