मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना आता महायुतीसमोर जागेवरून (Mahayuti Seat Sharing)नवा पेच निर्माण झाला आहे . महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ किंवा १३ जागा येणार असल्याची माहीती समोर आली आहे . मात्र शिंदेच्या शिवसेनेने आतापर्यंत फक्त आठ उमेदवार जाहीर केले आहेत . त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश आहे. एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना (Hemant Patil Hingoli) पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या या उमेदवारीला भाजपकडून प्रचंड विरोध केला जात आहेत . ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे . तसेच हेमंत पाटील, धैर्यशील मानेचा पत्ता कट होणार का ? अशा चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे .
हातकणंगलेमध्ये शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे मात्र या मतदारसंघात त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे .. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. तसेच हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटलांचं नाव घोषित केलं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना विरोध कायम केला आहे.. हा विरोध इतका आहे की शिवसेनेकडून हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे महायुतीतीतील जागेवरील तिढा अजूनही सुटलेला नाही .
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केल्याने वेगळाच तिढा निर्माण झाला आहे . कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एक जागा ही भाजपला मिळावी असा सुरुवातीपासून भाजपचा आग्रह आहे. त्यातल्या त्यात भाजपशी घट्ट नाळ जोडणाऱ्या रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केल्याने यावर दावा अधिकच वाढला आहे . त्याचमुळे एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता भाजपने ठाणे परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे