ताज्या बातम्या महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha : नंदुरबारच्या आखाड्यात गावितांना टक्कर देणारे गोवाल पाडवी कोण आहेत?

नंदुरबार : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे सुपूत्र अॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नंदुरबारात वकील विरूद्ध डॉक्टर असा सामना रंगणार आहे. २०१९ च्या लोकसभेत भाजपच्या हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवांचा पराभव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

गिरीश महाजनांसमोर रक्षा खडसे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, रक्षा खडसेंच्या उमेदवारीला का होतोय विरोध?

जळगाव : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, जळगाव भाजपातील अंतर्गत खदखद समोर आलीय. एका बैठकीत खासदार रक्षा खडसे आणि एका भाजपा कार्यकर्त्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. भाजपाच्या खासदार असतानाही गिरीश महाजनांचं नाव न घएता, रक्षा खडसे या एकनाथ खडसेंचं नाव का घेतात असा आक्षेप नोंदवण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या बैठकीतला हा व्हिडीओ सध्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर

मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भुजबळांना महायुतीचा राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार

X: @ajaaysaroj मुंबई: नाशिक लोकसभा सीटवर छगन भुजबळ यांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीला देखील देण्यात याव्यात असा आग्रहही त्यांनी केला आहे. या मागणीनंतर, केवळ लोकसभेतच नाही तर इतर बाबतीतही राष्ट्रवादी पक्षाचा योग्य मान ठेवला जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी अजित पवारांना दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते भुजबळ यांना महायुतीचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना बाहेरचा रस्ता ; शिंदेच्या शिवसेनेतून पक्षाच्या शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाणार

मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार केला आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवतारेंना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, अस प्रतिउत्तर शिवतारेंनी दिल्यानंतर अखेर शिंदे गटाकडून विजय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगडसाठी तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ; अजितदादांचा पहिला उमेदवार जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटात मतभेद सुरू आहेत . अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच (Raigad Loksabha)जाहीर केला आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांना उमदेवारी देण्यात आली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने भाजपाने (BJP)जय्यत तयारी केली असून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात सेलिब्रिटींना ( Star Powar Celebrity )उतरवले आहेत. भाजपाने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौतपासून भोजपुरी स्टार मनोज तिवारी, निरहुआ यांच्यापर्यंतच्या उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने रविवारी जारी केलेल्या पाचव्या यादीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांसाठी संघाची विशेष मोहीम, संघटनात्मक हालचालींना वेग

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. संघाकडून प्रत्यक्षात राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात येत नसला तरी संघाकडून मतदानवाढीसाठी पुढाकार घेतला जात आहे. लोकसभेसाठी संघ परिवारातर्फे विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोट्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत. आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल […]