ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश, सरकारकडून सर्व मागण्या मान्य

नवी मुंबई मराठा आरक्षणाच्या लढाईला अखेर यश आलं असून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने मध्यरात्री याबाबतच बैठक घेऊन पहाटे अध्यादेश काढला असून तो जरांगे पाटलांकडे पाठवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. याशिवाय समाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

Interim Budget 2024: निर्मला सीतारामण सादर करणार देशाचा 15 वा अंतरिम अर्थसंकल्प, जाणून घेऊया याविषयी…

नवी दिल्ली केंद्र सरकार १ फेब्रुवारी, २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाहून वेगळा असतो. यंदाच्या वर्षी देशात निवडणुका असल्याने पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आपला सहावा अर्थसंकल्प सादर करून त्या इतिहास घडवणार आहेत. याशिवाय अर्थसंकल्पापूर्वीची हलवा सेरेमनी पार पडली असून देशाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुलांना 100% शिक्षण मोफत ते आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती थांबवा, मराठा आंदोलकांच्या किती मागण्या मान्य?

मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांच्या अनेक मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत राज्य सरकारने सगेसोयरे संदर्भातील अध्यादेश जाहीर करावा, अन्यथा उद्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं अल्टीमेटम मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे. किती आणि कोणत्या मागण्या मान्य?१ शिंदे समिती रद्द करू नये, या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांवर होणार मुंबईत फुलांचा वर्षाव, पालिकेला दिले आदेश

मुंबई मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून निघालेला मराठा बांधव आज नवी मुंबईत मुक्काम करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मोठ्या संख्येने सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. असं असतानाही मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षावही केला जाणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

…तर ओबीसीवर प्रचंड अन्याय होईल; हरिभाऊ राठोडांकडून ओबीसी नेते आणि सरकारचा निषेध

मुंबई मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा प्रण मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी केला आहे. आज सकाळपासून नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव भगवे झेंड, टोपी घातलेले दिसून येत आहे. सरकारकडून जरांगे पाटलांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. त्यावर चर्चा सुरू असून येत्या काही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नितीश कुमार भाजपसोबत? बिहारमध्ये NDA सरकार स्थापनेचा हा आहे फॉर्म्युला

नवी दिल्ली बिहारमध्ये राजकीय घडामोडी वाढतच चालल्या आहेत. जेडीयू आणि भाजपमध्ये डील झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नितीशकुमार आणि भाजपमध्ये फॉर्म्युला ठरला आहे. जेडीयू आणि भाजप एकत्र आल्यास नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री राहतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी भाजपला मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचे होते. परंतू आता भाजप-जेडीयू युतीमध्ये नितीश कुमार यांची जेडीयू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ती अतिशय चुकीची…..’; कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीवर काय म्हणाले अजित पवार?

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर विरोधकांनी टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेत आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, प्रजासत्ताक दिनी धक्कादायक Video समोर

पंढरपूर महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने हातात एक बोर्ड घेतला आहे. या फोटोवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसेचा फोटो आहे. हातात त्यांचे फोटो घेऊन तरुण नथुराम गोडसेची जयची घोषणा देत आहे. त्याच्यासोबत जमाव असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंढरपूरातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्री छगन भुजबळ यांना ध्वजारोहणाचा मान नाकारला? वडेट्टीवारांकडून राज्य सरकारवर टीका

मुंबई प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं नाव नसल्याचं सांगितलं जात आहे. छगन भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नाकारल्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘दोन वेळा उपमुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोलेंची जहरी टीका

मुंबई मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने […]