ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मंदिर तोडून बाबरी मशीद बांधली नाही, महात्मा गांधींनीही…’; राम मंदिरावर ओवैसींची वक्तव्य

मुंबई २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान एआयएमआय़चे खासदार असुद्दीदीन ओवैसे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. महात्मा गांधींनीही राम मंदिराचा उल्लेख केला नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले ओवैसी?५०० वर्षांपासून मुस्लीम बाबरी मशिदीत नमाज पठण करत होते. काँग्रेसचे तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले जी.बी पंत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी

मुंबई राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘लाईट अँड साऊंड शो’ चालवता येत नाही ते महाराष्ट्र काय चालवणार? अतुल लोंढेंचा घणाघात

मुंबई भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे. भाजपा सरकारच्या नाकाखालून मोठे उद्योग राज्याबाहेर जात आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही, पेपर फुटत आहेत, बेरोजगारी प्रचंड असून नोकर भरती केली जात नाही, १०० पैकी ८८ लोक नोकरी शोधत आहेत. सरकार चालवण्यास भारतीय जनता पक्ष सक्षम नाही. गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळक उद्यानातील साधा ‘लाईट अँड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! एकाच दिवसात मविआच्या दुसऱ्या नेत्याला ईडीकडून नोटीस

मुंबई आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी मविआच्या नेत्यांना मोठा दणका दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काही तासांपूर्वी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स जारी केलं आहे. एकाच दिवसात मविआच्या दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांची राज्यसभेत एन्ट्री? राणेंचं तिकीट कापणार?

मुंबई एप्रिल महिन्यात राज्यसभेतील राज्यातील सहा जागा रिक्त होणार असल्याने राज्यसभेत कोणाला पाठवायचं यावरुन महायुतीत संगीत खुर्ची सुरू झाली आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पार्थ पवारांसह विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंनांही राज्यसभेत पाठवण्याची चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडल्याने महायुतीला फायदा होणार असून सहा पैकी पाच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजपकडून श्रीरामाचा वापर सत्तेसाठी’; संघ परिवार-विश्व हिंदू परिषदेतील पदाधिकारी ठाकरेंसोबत

मुंबई भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मातोश्रीवर पक्ष प्रवेश केला. मुंबई उपनगरात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या भाजप रामराज्य म्हणत रावणराज्यच्या दिशेने जात आहे. रामाच्या नावाखाली देशात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोठा धक्का! भाजप आणि संघ परिवरातील पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश

मुंबई भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार आहेत. आज दुपारी ते उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रदिप उपाध्याय भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव, घनश्याम दुबे विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख, राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मला पण अशा घरात…’, आवंढा गिळला अन् सोलापूरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक

सोलापूर आज सोलापूरातील कामगार वर्गासाठी हक्काचं घर मिळालं आहे. या गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांच्या लोकर्पणाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक झाले. यावेळी ते म्हणाले, मला पण लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले. पुढे ते म्हणाले, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आज मोदींनी एक गॅरेंटी पूर्ण केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धंगेकरांना राम पावणार, 10 महिन्यांच्या आमदारकीनंतर आता भाजपकडून थेट खासदारकीचं तिकीट?

पुणे पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दमदार विजय मिळवणाऱ्या रवींद्र धंगेकरांना राम पावणार, असंच काहीसं चित्र आहे. काँग्रेसच्या तिकीटावर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सिक्सर मारणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची ओळख आपला माणूस म्हणून केली जाते. मार्च २०२३ च्या निवडणुकीत २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हे करार करायला दावोस दौरा?’ विरोधकांचा निशाणा; 2 दिवसात कोणत्या कंपन्यांसोबत किती कोटींचा करार, पाहा यादी!

मुंबई महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १० जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तब्बल ३ लाख ५३ हजार ६७५ कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तर १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असून यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. मात्र […]