मुंबई
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १० जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तब्बल ३ लाख ५३ हजार ६७५ कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तर १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असून यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
मात्र या दौऱ्यावरुन विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या कंपन्यांसोबत करार केले, त्यातील अधिकांश भारतीय असल्याने दावोसमध्ये जाऊन हा करार करण्याची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रोहित पवारांनंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
दोन दिवसातील सर्वात मोठा करार हा अदानी ग्रुपसोबत ५० हजार कोटींचा झाला असून यातून ५०० रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दोन दिवसात कोणत्या कंपन्यांशी किती कोटींचा करार…
१६ जानेवारी
आयनॉक्स एअर प्रॉडक्ट
२५ हजार कोटी (५ हजार रोजगार)
बी.सी.जिंदाल
४१ हजार कोटी (५ हजार रोजगार)
जेएसडब्ल्यू स्टील
२५ हजार कोटी (१५ हजार रोजगार)
एबी इन बेव्ह
६०० कोटी (१५० रोजगार)
गोदरेज अॅग्रोव्हेट
१००० कोटी (६५० रोजगार)
अमेरिकास्थित डेटा कंपनी
१० हजार कोटी (२०० रोजगार)
१७ जानेवारी
अदानी ग्रुप
५० हजार कोटी (५०० रोजगार)
स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स
११५८ कोटी (५०० रोजगार)
इंडियन ज्वेलरी पार्क
५० हजार कोटी (१ लाख रोजगार)
वेब वर्क्स
५ हजार कोटी (१०० रोजगार)
लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआस, केएसएच, प्रगती यांची मिळून ३५०० कोटी (१५ हजार रोजगार)
नैसर्गित संसाधनातील कॉन्गलोमिरेट कंपनी
२० हजार कोटी (४ हजार रोजगार)