ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? आपचा धक्कादायक सवाल

पुणे पुण्यामध्ये कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. शरद मोहोळ याची पत्नी सध्या भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी आहे, त्यामुळे पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? असा धक्कादायक सवाल आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र देण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायामूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं पाऊल मानलं जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील ज्यांच्या कुणबी नोंदी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाला धक्का! ACB च्या चौकशीनंतर राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

रत्नागिरी एसीबीच्या चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपपत्रात त्यांची पत्नी, मुलगा यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीकडून धाड टाकण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा राजन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन घरच्याच डब्यातील जेवण करून येण्यासारखं…’, शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन रोहित पवारांचा निशाणा

मुंबई महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १० जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तब्बल ३ लाख ५३ हजार ६७५ कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तर १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असून यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. यापूर्वी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानसभा अध्यक्षांची तातडीची पत्रकार परिषद, ठाकरेंच्या ‘जनता न्यायालया’नंतर साधणार संवाद

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं आहे. आज या प्रकरणात उद्धव ठाकरे महापरिषद घेणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक देखील सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी ५ वाजता राहुल नार्वेकर तातडीची पत्रकार परिषद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपतर्फे मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण, आशिष शेलारांची माहिती

मुंबई अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देऊ, 21 तारखेपर्यंत थांबा’ – उदय सामंत

मुंबई दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक इकॉनॉमिक फोरममध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक एमओयू करतील. एकाही रुपयाचा अपव्यय तिथे होणार नाही आणि या फोरममध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये ऐतिहासिक ठसा उमटवेल याचा मला महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. उदय सामंत पुढे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? अजित पवार गटाला सर्वात कमी जागा

मुंबई येत्या काही दिवसा लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही कोण किती आणि कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. अद्यापही दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरूच आहे. एकीकडे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होतील की नाही याचा निर्णय झाला नसला तरी महायुतीचा लोकसभा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वऱ्हाड निघालं दावोसला’, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई राज्यात अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचे शिष्टमंडळ दावोस आर्थिक परिषदेसाठी जाणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यंदा राज्यात सुमारे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात येणार असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. गद्दारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील एका जागेवरुन ठाकरे-पवारांमध्ये नवा फॉर्म्युला ठरणार!

मुंबई लोकसभा निवडणुकीत मुंबईतील एक मतदारसंघ मिळावा यासाठी शरद पवार आग्रही राहिल्याची चर्चा आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील रावेर आणि जळगाव दोन्ही मतदारसंघ हवे असतील तर मुंबईच्या जागेवर त्यांना पाणी सोडावं लागणार अशी चिन्हं आहेत. दुसरीकडे शरद पवार नाशिक, दिंडोरी या जागांसाठीही इच्छूक आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव बाबुराव देवकर २,९९,२४० […]