ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस, बावनकुळे रेशीमबाग संघ कार्यालयात, भाजपा आणि संघाच्या प्रांताची समन्वय बैठक

नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भा प्रांताची समन्वय बैठक आज, सोमवारी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात घेण्यात आली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसह ज्येष्ठ भाजप नेते आज, सोमवारी साकाळी 9.30 वाजेच्या सुमाराला रेशीमबागेत पोहचले. याठिकाणी डॉ. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार सुरू आहेत’, राज ठाकरेंची जहरी टीका

अलिबाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज अलिबागमध्ये जमीन परिषद पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी जमीन अधिग्रहणाच्या गंभीर मुद्द्यावर लोकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. राज्यातील जमिनी परप्रांतीयांच्या हातात जाऊ नये म्हणून राज ठाकरेंनी अलिबागमध्ये जमीन परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी जमीन विकू नका असं आवाहन केलं. दुबईसारख्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जागतिक बँकेच्या अहवालानंतर ठाकरे गटाची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

मुंबई जागतिक बँकेच्या एका अहवालावरुन ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, १८० रुपयांवर गुजराण करणाऱ्या देशांच्या यादीत दक्षिण आशिया खंडातील सर्वाधिक देशांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारतातील ७० टक्के नागरिकांचा समावेश आहे. २०२३ च्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार जगातील सर्वात गरीब लोकांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल ३८९ दशलक्ष लोक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मुजोर राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, शंकराचार्य, हिंदू धर्माचा अपमान प्रकरणी काँग्रेसचा आक्रोश

मुंबई भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांना प्रश्न विचारून हिंदूंचा अपमान करणा-या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यभर हे आंदोलन करण्यात आले, यावेळी नारायण राणेंविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. हिंदू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडे, प्रितम मुंडे की धनंजय मुंडे; बीडमधून लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण?

बीड आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज बीडमध्येही महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बीड लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोण असेल, यावर जणू शिक्कामोर्तब करण्यात आला. या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी भाषणं केली. भाजपचे रमेशराव आडसकर आपल्या भाषणात म्हणाले, महायुतीचाच आणि भाजपच्या खासदार डॉ. प्रितम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

15 दिवसात राज्याच्या राजकारण मोठे भूकंप होणार, भाजप नेत्याचे संकेत

मुंबई आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काँग्रेसला धक्का बसला. तब्बल ५५ वर्षांपासूनचं काँग्रेससोबतच्या नात्याचा असा शेवट झाला. याबद्दल बोलताना मिलिंद देवराही भावुक झाले होते. दरम्यान भाजप मंत्र्यांनी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात आणखी कोण महायुतीचा हात धरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यभरात महायुतीचे महामेळावे, राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून आज राज्यसभरात विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले. यावेळी राज्यातील २५ मंत्र्यांसह ५२ नेत्यांवर प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे हे या मेळाव्यामागील महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. जाणून घ्या कोणत्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र व देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला 

X: @NalawadeAnant मुंबई: भाजप सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश असून विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठीच ते ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहेत. पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘रिलायन्स ही गुजराती कंपनी…’, तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, गुजरातला जाऊन बसा; अंबानींच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक

मुंबई रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केलेल्या वक्तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया देत गुजराती कंपनी असेल तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, अँटिलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात काय करता? असा सवाल उपस्थित केला. यावेळी पुढे ते म्हणाले, रिलायन्स […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘आमदार फोडणाऱ्यांकडून आता पेपर फोडणाऱ्यांना संरक्षण’; तलाठी भरती घोटाळ्याच्या SIT चौकशीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर

मुंबई राज्य शासनाने सारथी, बार्टी, महाज्योतीकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते. यासाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षेत सीलबंद प्रश्नपत्रिका आणि सील नसलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पेपरफुटीचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. त्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सारथी कार्यालयावर मोर्चा काढला. काही विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परीक्षेत […]