मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून आज राज्यसभरात विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले. यावेळी राज्यातील २५ मंत्र्यांसह ५२ नेत्यांवर प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे हे या मेळाव्यामागील महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
जाणून घ्या कोणत्या नेत्यावर कुठली जबाबदारी –
जालना : श्रीमती चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)
गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)
अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)
अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)
सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)
अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)
पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)
भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)
धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)
लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)
धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)
परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)
पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)
सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)
हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)
मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री,
रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)
कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)
बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)
सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)
ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)
मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)
गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)
नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)
वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)
जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)
दरम्यान बीडमध्ये आज (१४ जानेवारी) झालेल्या महायुतीच्या मित्र पक्षांच्या स्नेह मेळाव्यात वाद निर्माण झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा फोटो न लावल्याने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. तर दुसरीकडे योगेश क्षीरसागरांच्या बॅनरवर फोटो किंवा नाव नसल्याने योगेश क्षीरसागरांचे कार्यकर्तेही घोषणाबाजी करत संताप व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय.